Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सकल माळी समाज कल्याण- मुंबई आयोजित वधू-वर परिचय मेळावा संपन्न, समाजातून उत्तम प्रतिसाद


   कल्याण दि २(प्रतिनिधी) आजकाल मुलामुलींचे लग्न जमत नाही आणि लग्न जमलं तर टिकत नाही असे का? याचा सारासार विचार उपवर मुलामुलींनी व त्यांच्या पालकांनी करायला हवा* असे प्रतिपादन श्री क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ मुंबईचे माजी अध्यक्ष व विद्यमान सल्लागार तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश माळी सर यांनी कल्याण येथील स्वामी नारायण सभागृहामध्ये आयोजित सकल माळी समाज वधू-वर परिचय मेळाव्यात केले.
      मेळाव्याचे उद्घाटक श्री.एन.व्ही.महाजन अध्यक्ष सावित्रीबाई फुले शिक्षण सहाय्यक मंडळ कल्याण व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश माळी सर यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
      यावेळी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजक अनिल काकडे,श्री.क्षत्रिय माळी समाज मंडळ मुंबईचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश माधवराव महाजन व सल्लागार निळकंठ महाजन यांच्यासह प्राचार्य वसंत माळी,ऍड.भास्कर अहिरे,कैलास सरोदे,सुभाष सरोदे,यश महाजन,सौ.लता पाटील,सौ.वासंती महाजन,सौ.ज्योती नाईक आदि मान्यवर उपस्थित होते.अनिल काकडे यांच्या प्रस्तावनेनंतर वसंत माळी,भास्कर अहिरे,कैलास सरोदे,लता पाटील,प्रशांत माळी आणि एन.व्ही.महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर जवळपास ६० पेक्षा जास्त उपवर मुलामुलींनी आपला परिचय देऊन मेळावा यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.