Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नवापुर हद्दीत अवैध दारूचा साठा व वाहतुक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..! तब्बल 92 लाख 78 हजार 460 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार दि २५ (जिल्हा प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  हेमंत पाटील यांना दि.२४ रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रायपुर ता. नवापुर येथील भावीन कोकणी हा त्याच्या घराच्या जवळ असलेल्या शेताला लागुन वनामध्ये अवैधरित्या दारुचा साठा साठवुन त्याची वाहनामध्ये वाहतुक करीत आहे, अशी खात्रीशीर गुप्त माहिती मिळालेवरुन जिल्हा पोलीस अधीक्षक  श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  हेमंत पाटील यांनी पथकास बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले.
         मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने भावीन कोकणी याचे घराजवळील शेताजवळ असलेल्या लहान टेकडीच्या शेजारी झाडाझुडपातील खाचेच्या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम व वाहने असे जमिनीवर ठेवलेल्या दारु सहित दिसुन आले. सदर इसमांना पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने ते तेथून पळ काढत असतांना पथकाने एका इसमाला ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव धर्मेश मंगु धोडी, वय 36 वर्षे, रा. एकलारा, जि. वलसाड, गुजरात असे सांगितले. व सदरचा माल हा भाविन कोकणी याचा असल्याचे त्याने सांगितले. सदर ठिकाणी एकुण 04 चारचाकी वाहने मिळून आली असुन त्यांचे क्रमांक पुढीलप्रमाणे- 1) MH 04 FZ 6698 2) GJ 19 BE 8109 3) GJ 02 CL 1254 4) MH 39 J 3000 असे असुन सदर वाहनांमध्ये दारुचे बॉक्स मिळून आले.
त्याअन्वये सदर ठिकाणाहुन एकुण 92 लाख 78 हजार 460 रुपये किमतीचा अवैध दारुचा मुद्देमाल एकुण 04 वाहनासह जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. वर नमुद आरोपीविरुध्द नवापुर पोलीस ठाणे येथे महा. दारुबंदी कायदा कलम 65 (अ) (ई), 108, 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक  श्रवण दत्त, एस. अपर पोलीस अधीक्षक  आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  हेमंत पाटील, पोउपनि विकास गुंजाळ, पोहेकों/जितेंद्र तांबोळी, जितेंद्र तोरवणे, बापु बागुल, नितीन गांगुर्डे, दिनेश चित्ते, मुकेश तावडे, मनोज नाईक, विशाल नागरे, अजित गावीत, सचिन वसावे अशांनी केली आहे.