Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा शहरात ठगीचा व्यवसाय, जनतेला ब्रँडेड कंपनीच्या ए सी, टी व्ही, आणि इन्व्हर्टर कमी किमतीत देण्याचा बहाण्याने अनेकांना लाखोंचा चूना

तळोदा शहरात ठगीचा व्यवसाय, जनतेला ब्रँडेड कंपनीच्या ए सी, टी व्ही, आणि इन्व्हर्टर कमी किमतीत देऊ सांगून अनेकांना लाखो रुपयांत चूना लावला आहे. नागरिकांची  दिशाभूल करून दिवसाढवळ्या नागरिकांचा खिशात डाका टाकणा-याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 तळोदा शहरात मागील सहा ते आठ महिन्यापासून संगम टेकडी भागात राहून  बॅटरी व इन्व्हर्टरची दुकान कुकरमुंडा  येथे चालवणाऱ्या  व्यक्ती कडून तळोदा शहरातील सामान्य जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे.दुकान दुकान फिरून आपणास ब्रांडेड कंपनीची एसी, टीव्ही आणि इन्वर्टर हे २०२३-२०२४  या आर्थिक वर्षातील वस्तू न  विकला गेलेला  माल आहे, असे सांगून लोकांकडून पंधरा ते वीस हजार मागणी करतो. आपला चोरीचा व्यवसाय नाही असे सांगून फसवणूक करतो, एकदा पैसे मिळाले की, हा व्यक्ती वस्तुही आणून देत नाही आणि पैसेही परत देण्यास टाळाटाळ करतो. सदर गोष्टी पैसे देणा-याचा लक्षात येताच, हा ज्यांचा कडून पैसे खाल्ले आहेत त्या व्यक्तीला आपले संबंध खुप चांगले आहेत,धीर धरा , समोरचा व्यक्ती मला माल पाठवेल की लगेच तुला देतो असं वेळ मारुन नेण्यासाठी  पुन्हा १०-१५ दिवस वेळ मागून घेतो, सदर व्यक्ती अशी लूबाडणुक, खोटे काम करत असतांना आढळला आहे. तरी या व्यक्ती पासून शहरातील जनतेने लांब राहावे, ज्यांना ज्यांना गंडा घातला आहे त्यांनी पोलिस प्रशासनाकडे या व्यक्तींवर कार्यवाहीसाठी तक्रार, करावी अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे.