नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान...!
नंदुरबार दि.(जिल्हा प्रतिनिधी) १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम पोलीस मुख्यालय मैदान, नंदुरबार येथे उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला. सदर कार्यक्रम वैदयकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष उपस्थितीत पार पडला. यावेळी मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन उपस्थितांना पालकमंत्री मुश्रीफ यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत संबोधित केले.
त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमात महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय/प्रशंसनीय सेवेबद्दल एकुण ०६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालकाचे बोधचिन्ह सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्राने पालकमंत्र्यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
पोलीस महासंचालक पदक जाहीर झालेल्यांमध्ये 1) पोलीस निरीक्षक अर्जुन अब्बास पटले, नेमणुक- अ.ज. प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार 2) श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, भगवान बापुराव धात्रक, नेमणुक नियंत्रण कक्ष, नंदुरबार 3) सहा. पोलीस उपनिरीक्षक, राकेश वसावे, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार 4) पोहेकॉ/875 सुपडू पंडीत राठोड, नेमणुक- सारंगखेडा पोलीस ठाणे, नंदुरबार 5) पोहेकॉ/134 संजय दौलत माळी, नेमणुक- धडगाव पोलीस ठाणे, नंदुरबार 6) पोहेको/146 सुभाष बापू तमखाने, नेमणुक- पोलीस मुख्यालय, नंदुरबार यांचा समावेश आहे.