मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक म्हसावद ते तोरणमाळ जाणाऱ्या रस्त्यावरील राणीपुर दशामाता मंदिराजवळ येऊन थांबले असता अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्या वरील नमुद पिकअप वाहनाचा शोध घेत असतांना 20.20 वाजेच्या सुमारास पथकास म्हसावद गावाकडून तोरणमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची पिकअप वाहन येतांना दिसले त्यावेळी सदर वाहनातील चालक व क्लीनर यांनी पोलीस पथक आल्याचे पाहुन वाहन रस्त्यावर थांबवुन पळ काढला. त्यावेळी पथकाने वाहनाचे जवळ जाऊन पाहणी करता वाहनाचा क्रमांक एम एच 15 एच एच 8276 असा दिसून आला सदर वाहनाची पथकाने तपासणी करता त्यामध्ये अवैध दारुचा मुद्देमाल मिळुन आला. त्याअन्वये एकुण 26,80,000/- रुपये किमतीची अवैध दारु वाहनासह जप्त करण्यात आली.
त्याचप्रमाणे सदर दारुचा मुद्देमाल हा म्हसावद येथील सत्तार ठाकरे याचा असुन सदर वाहनातील माल हा त्याचे राहत असलेल्या घराजवळील रुममध्ये भरलेला असुन त्याने रुममध्ये आणखी अवैध दारुचा मुद्देमालाचा साठा केला असलेबाबत गोपनिय माहिती मिळालेवरुन स्था.गु.शा. पथक, पंच असे नमुद ठिकाणी पोहचले व इसम नामे सत्तार ठाकरे, रा. म्हसावद (अनकवाडे) ता. शहादा जि. नंदुरबार याच्या घराजवळ अवैध दारुच्या साठयाचा शोध घेत असतांना त्याचे घर बंद दिसुन आले. त्यावेळी पथकाने घराची तपासणी करता त्याठिकाणी अवैध दारुचा एकुण 29,64,480/- रुपये किमतीचा साठा मिळुन आला आहे. तसेच एका व्यक्तीचे आधारकार्ड देखील मिळुन आले.
सदर कारवाईत एकुण 56 लाख 44 हजार 480 रुपयांचा अवैध दारुचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असुन एकुण 04 इसमांवर म्हसावद पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 193/2026 महा. दारुबंदी कायदा कलम 65 (अ) (ई), 108, 81 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि- मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोहेकॉ जितेंद्र पाडवी, दादाभाऊ वाघ, सजन वाघ, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, सुनिल येलवे, सचिन वसावे, पुरूषोत्तम सोनार पोशि/यशोदिप ओगले, राजेंद्र काटके अशांनी केली आहे.