Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माळी विकास मिशन महाराष्ट्रचा वतीने राज्यातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा प्रबोधन शिबिरात सत्कार

पूणे सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क 
       माळी विकास मिशन महाराष्ट्रचा वतीने राज्यातील नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, महापौर, उपमहापौर, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, पंचायत समिती सदस्य व सभापती सत्कार सोहळा व प्रबोधन शिबिर 2026 पुणे येथे आयोजित करण्यात आले.
      तळोदा येथील नगरसेवक शिरीषकुमार माळी (बब्बू नाना)  यांचा पुण्यात सत्कार 

दि ३१ में २०२६ रोजी पुण्यनगरी येथे महात्मा फुले यांच्या पुण्य भूमीत आणि सावित्रीमाई फुले सभागृहात राज्यभरातील सर्व नगरसेवकांचा प्रबोधन शिबिर आणि सत्कार सोहळा कार्यक्रम अतिशय दिमाखात पार पडला. कार्यक्रमास आमदार योगेश अण्णा टिळेकर, आमदार कपिल पाटील,आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर, डॉ प्रज्ञाताई सातव, ह भ प सावता महाराज वसेकर उपस्थितीत होते.

 समाजातील ओबीसी संघर्ष योद्धे ॲड मंगेश ससाणे, ॲड मृणाल ढोले- पाटील आणि प्रा. विठ्ठलजी तळेकर यांनी उपस्थितांना भविष्यातील धोक्याची जाणीव करून दिली. समाजाचे मुकुटमणी आणि प्रमुख मार्गदर्शक शेखरजी गायकवाड आण महेशजी झगडे यांनी आपल्या सुमधुर वाणीने आणि अतिशय नेटक्या शब्दांमध्ये प्रशासनावर कशा पद्धतीने आपण काम केले पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांची कामे करून घेत असताना कशा पद्धतीने प्रशासनाशी वागले पाहिजे याबद्दल अतिशय सविस्तर असे मार्गदर्शन केले. खासदार डॉ अमोल कोल्हे यांना वेळेत कार्यक्रमाला पोहचता न आल्यामुळे मोबाईलवरूनच उपस्थितांना मार्गदर्शन केले. आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. समाजातील भावी आय एस ऋतुजा हिचाही सत्कार करण्यात आला.
 यावेळी उद्योग क्षेत्रातील प्राथमिक स्वरूपामध्ये काही उद्योजकांचा "माळी उद्योग रत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राज्यातील बहुसंख्या नगरसेवकांनी आणि जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माळी विकास मिशनचे सर्व राज्य समन्वयक अशोक भुजबळ, सुरेश जाधव, कुंडलिक चौधरी, अमृतराव काळोखे, संतोष भोजने, गोविंद डाके, उमेश महाजन, मिलिंद घोडेकर, राजेंद्र अहिरे, विलासराव इंगळे, वासुदेव चौधरी श्रीमती अरुणा माळी आणि श्रीमती शितलताई साखरे या सर्वांनीच अतिशय अथक मेहनत करून या कार्यक्रम यशस्वी केला.