Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अभाविप उमरगा शहर मंत्री म्हणून समर्थ कुंभार यांची निवड, कार्यकारणी घोषित

अभाविप उमरगा नवनिर्वाचित शहर मंत्री म्हणून समर्थ कुंभार यांची निवड करण्यात आली व उर्वरित कार्यकारणी घोषित
सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि ८ ऑगस्ट
        अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उमरगा शाखेच्या वतीने छात्रसत्ता विद्यार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभाविप उमरगा शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून लातूर विभाग संयोजक  यश आरिकर उपस्थित होते.

निर्वाचन अधिकारी  गणेश कटके यांनी शहर मंत्री म्हणून समर्थ कुंभार यांची घोषणा करण्यात आली. तसेच उर्वरित कार्यकारिणीची घोषणा शहर मंत्री यांनी केली. प्रास्ताविक तालुका संयोजक यांनी मांडले,यावेळी लातूर विभाग संघटन मंत्री  महेश भवर, धाराशिव जिल्हा संयोजक  राजेश कवडे, धाराशिव दक्षिण भाग संयोजक  पंकज बेळकोने, उमरगा तालुका संयोजक  धनेश जाधव तसेच धाराशिव शहर विद्यार्थी विस्तार पवन नरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शहर सहमंत्री म्हणून नामदेव शिंदे व ऋतुजा शिंदे, शहर कार्यालय मंत्री शेखर सूर्यवंशी, कार्यालय सहमंत्री स्नेह महामुनी, कोष प्रमुख शुभम कांबळे, सोशल मीडिया संयोजक राजकुमार कांबळे व सहसंयोजक तुकाराम शिंदे, स्टुडंट फॉर डेव्हलपमेंट संयोजक हिंदवी भुरे व सहसंयोजक ओंकार सुरवसे, स्टुडंट फॉर सेवा संयोजक प्रणव कुलकर्णी, राष्ट्रीय कलामंच संयोजक प्रतीक्षा राठोड व सहसंयोजक स्वाती शिंदे, खेलो भारत संयोजक व्यंकट जाधव व सहसंयोजक गुंडप्पा माशाळे, फार्मा व्हिजन संयोजक सृष्टी ख्याडे तसेच शहर कार्यकारिणी सदस्य अभिषेक मिसाळ यांची निवड करण्यात आली.