Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आदिवासी स्वातंत्र्याचा 75 वर्षे नंतर ही पाण्यासाठी उपेक्षित - बिरसा फायटर्स दापोली दि २८(प्रतिनिधी) पाणी नसल्यामुळे शाळकरी मुलांना शाळेत वेळेवर जाता येत नाही; गुरूजी नाराज होतात,शिक्षणात अडथळा येतो असे निवेदन तहसीलदार यांना बिरसा फायटर्स तर्फे देण्यात आले आहे. दापोली ग्रामपंचायत कांगवई व पंचायत समिती दापोली तर्फे आदिवासी वाडीतील लोकांकरिता पाण्यासाठी जागेची सोय करण्यात यावी,या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संदिप पवार, माजी पंचायत समिती सदस्य काळूराम वाघमारे,अशोक गणपत पवार, अशोक दामोदर पवार, शुभांगी वाघमारे इत्यादी आदिवासी बांधव उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की,दापोली तालुक्यातील गांव कांगवई येथील शेताचे स्थानिक नाव सूर्यवंशीचे पाणी या ठिकाणी ग्रामपंचायत कांगवई तर्फे पाण्याची तळी व पाखाडीचे शासकीय काम झालेले असून सदर जागा ओहोळात आहे.या पाण्याच्या तळीतील पाणी आम्ही आदिवासी बांधव पिढ्यानपिढ्या पाणी पित आहेत.परंतु तेथे पाण्यासाठी अडचण निर्माण झाली असून आदिवासी लोकांच्या नांवे कोणत्याही मालकीची जागा नाही.त्यामुळे 15 वा वित्त आयोग सन 2021 /2022 पंचायत समिती स्तर अंतर्गत दुरूस्तीसाठी मंजूरी झालेले 7.50 लाख रूपये परत जाण्याची शक्यता आहे.आदिवासी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. पाणी नसल्यामुळे आमच्या शाळकरी मुलांना वेळेवर शाळेत जाता येत नाही; गुरूजी मुलांना रागावतात, नाराज होतात.आदिवासी वाडीतील लोकांसाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था होणे अत्यंत आवश्यक आहे.तरी ग्रामपंचायत कांगवई व पंचायत समिती दापोली मार्फत अद्यापही पाण्याची सोय करण्यात आलेली नाही.त्यामुळे आमच्या आदिवासी लोकांचे हाल होत आहेत. म्हणून ग्रामपंचायत कांगवई व पंचायत समिती दापोली मार्फत तात्काळ कांगवई गांवातील आदिवासी वाडीतील लोकांकरिता पाण्यासाठी जागेची सोय करण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने तहसीलदार यांच्याकडे केली आहे.