अक्कलकुवा दि २८(प्रतिनिधी) अक्कलकुवा येथे वाहनाचा व इन्व्हटर्र बॅटरीचा गोडावूनचे वरील पत्रा उचकटून आत प्रवेश करीत 58 वेगवेगळ्या कंपनीच्या बॅटरीसुमारे 1 लाख 45 हजार 900 रु मुद्देमाल चोरून नेल्याची घटनाअक्कलकुव्यात घडली अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की अक्कलकुवा शहरात सीता नगरच्या रस्त्यावरील जिया आटो व इलेक्ट्रिक वर्क्स व बॅटरी इन्व्हटर्र चे दुकान असून लगत असलेल्या बॅटरी गोडाऊन चे पत्रे बाजूला उचकटून गोडाऊन मध्ये प्रवेश करून वेग वेगळ्या कंपनीच्या इन्व्हटर्र् व वाहनाचा बॅटरी एकूण 58 बॅटरी सुमारे 1 लाख 45 हजार 900 रु मुद्देमाल चोरून नेला म्हणून मकसूद खान अब्दुल रहीम खान पठाण यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गु. र .नं 100/2023 भादवि कलम 380, 454, 457 प्रमाणे गून्हा दाखल असून पुढील तपास पो. उ. नि. रितेश राऊत हे करीत आहेत.