तळोदा दि २८(प्रतिनिधी)
तळोदा तालुका व शहरातील नागरिकांना अद्यापपावेतो आनंदाचा शिधा मिळाला नसल्याने परिवर्तन युवा मंचतर्फे मा.तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात महाराष्ट्र शासन राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील शिधापत्रिका धारकांना गुढीपाडवा व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयतीनिमित्त शंभर रुपयांत आनंदाचा शिधा वाटप करण्याचा महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. शंभर रुपयांत तेल,रवा, चनाडाळ, साखर असे वाटप करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले होते.
परंतु अद्यापपावेतो आनंदाचा शिधा मिळालेला नाही. तालुक्यातील व शहरातील लाभधारक संभ्रमित अवस्थेत आहेत. गुढीपाडवा होऊनही आनंदाचा शिधा मिळाला नाही. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील जवळ येत आहे. तरी आपण शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा त्वरीत उपलब्ध करुन द्यावा.
अशी मागणी परिवर्तन युवा मंचतर्फे करण्यात आली.
निवेदन देतेवेळी नितीन गरुड, सिद्धार्थ नरभवर, शुभम खाटीक, विशाल सामुद्रे, ईश्वर पाडवी, राजेश तिजविज, मनोज खैरनार, सुमित नरभवर, किशन साठे, यश पानपाटील, ऋषी पाडवी, संघप्रिय नरभवर, रमिज पिंजारी, साहिल नरभवर, अविनाश सुरवाडे,प्रणय सुर्यवंशी,मयूर अहिरे,अजय बरखडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
आनंदाचा शिधा वाटप बाबत नियोजन झाले असुन लवकरच शिधात्रिकाधारकांना शिधा वितरण करण्यात येणार आहे.असे आश्वासन नायब तहसीलदार व्हि.आर.ससे तळोदा यांनी निवेदन करत्यांना दिले.
नितिन गरूड (सामाजिक कार्यकर्ता तळोदा)
सण-उत्सव दरम्यान आनंदाचा शिधा शिधात्रिकाधारकांना मिळायला पाहिजे. वेळ निघुन गेल्यावर आनंदाचा शिधा मिळाल्यास लाभधारकांतील आनंद नाममात्र राहील.