सावरकरांचा अपमान केल्यापासून राहूल गांधी यांचे विरोधात राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गट आणि भाजप आक्रमक झाले आहेत. दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहुल गांधीच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. राहुल गांधींकडून सातत्यानं सावरकरांचा अपमान करण्यात आला आहे.
मूख्यमंत्रींनी खडसावत राहुल गांधीना सांगितले सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. सावरकर व्हायला तेवढा त्याग आणि प्रेम तुमच्यात असायला हवं. तुम्हाला काय देशाबद्दल प्रेम असणार; तुम्ही तर परदेशात जाऊन भारताची निंदा करता. यावेळी सावरकरांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख करुन कार्याला उजाळा शिंदेंनी दिला.
अनेक दिवसांनी या वक्तव्यावर विरोधी पक्ष आणि ठाकरेंनी विरोधी दर्शवला. तो विरोध औपचारिकता म्हणून होत आहे. तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो अशी गत विरोधी पक्षाची झाली असल्याचं शिंदे म्हणाले. त्याचबरोबर राज्यभरात सावरकर गौरव जनता यात्रा सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.