(प्रतिनिधी) राज्य शासनाच्या पुरवठा विभागातर्फे सण उत्सवानिमित्त जारी करण्यात आलेला आनंदाचा शिधा जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना रेशन दुकानदारांमार्फत नियमित मिळावा अशी मागणी जिल्हाधिकारींना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
या संदर्भात ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी सदस्य महेंद्र चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्य शासनातर्फे गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र नंदुरबार शहर व जिल्ह्यातील अनेक रेशन दुकानदार ग्राहकांना आनंदाचा शिधा अजून देत नाही. हे वितरण नियमित करण्यात यावे.गोरगरिबांच्या आनंदाचा घास हिरावून घेणाऱ्या रेशन तस्करांवर जिल्हा पुरवठा विभागाने तात्काळ कारवाई करावी. रेशनिंग माल साठा
होणाऱ्या गोदामावर आणि तेथील मॅनेजरवर तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे.या संदर्भात येत्या आठ दिवसात निर्णय न झाल्यास सर्वसामान्य ग्राहकांच्या हितासाठी जन आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा निवेदनातून महेंद्रभाई मंगाभाई चौधरीी यांनी दिला आहे.