(प्रतिनिधी) चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त सुरू झालेल्या नाशिक जिल्ह्यातील नांदुरी येथील सप्तशृंगी देवी गडावरील यात्रेनिमित्त नंदुरबार आगरातर्फे ज्यादा बसेस उपलब्ध करण्यातत आल्या आहेत.ग्रामीण भागातून सलग 44 प्रवासी उपलब्ध झाल्यास स्वतंत्र बस देणयात येतील.
महाराष्ट्रसह खानदेशची कुलस्वामिनीी आणि साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या नांदुरी येथील सप्तशृंगी गडावरील यात्रेस प्रारंभ झाला आहे.असंख्य भाविक पदयात्रेने जात आहेत.मात्र ते अनेकांना शक्य नसल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातर्फे नंदुरबार जिल्ह्यातील प्रवाशांसाठी विशेष जादा बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.नंदुरबार शहरासह तालुक्यातील एखाद्या खेडेगावातून सलग 44 प्रवासी उपलब्ध झाल्यास
थेट नांदुरी पर्यंत बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस द्वारे यात्रा दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन धुळे विभागीय नियंत्रक विजय गीते आणि नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.