राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, वर्ग, तुकड्यांवरील 20%, 40%, 60% अनुदानास पात्र कर्मचाऱ्यांचे वेतन विनाअट 31 मार्च 2023 पूर्वी अदा करण्याबाबत पदवीधर आमदार सत्यजितजी तांबे यांनी शालेय शिक्षण मंत्री दिपकजी केसरक यांची भेट घेत सविस्तर चर्चा करून निवेदन दिले.
दि. 06 फेब्रुवारी 2023 रोजी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, वर्ग व तुकड्यांना 20, 40 व 60% अनुदानास पात्र केले. परंतु अनुदान देताना अतिशय जाचक अटी घातल्या असून त्यामध्ये आधार कार्ड सरल पोर्टलवर अपडेट करण्यास सांगितले. परंतु आधार अपलोड करतांना व्हॅलिड आधार कार्ड देखील इनव्हॅलिड दाखविले जाते.
आपण याबाबत सभागृहामध्ये सांगितले होते की, पोर्टलमध्ये दोन दिवसात सुधारणा करण्यात येईल, आणि तसे नाही झाले तर आपण यावर मार्ग काढू परंतु पोर्टलमध्ये अद्यापही सुधारणा झालेली नाही.
तातडीने हा निधी मा. शिक्षण उपसंचालक यांच्या खात्यावर वर्ग करून शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्याकडून तीन महिन्यात ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतचे हमी पत्र घेऊन या सर्व शिक्षकांचे दि. 31 मार्च 2023 पूर्वी वेतन अदा करावे, ही विनंती आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.