Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

देशात कोरोना पून्हा सक्रीय सावधानतेचा इशारा

देशात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले, 10 - 11 एप्रिलला मॉक ड्रिल
                 देशात कोरोना विषाणुचा पुन्हा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोना व्हेरिएंटचा पॉझिटिव्ह रेटही वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने राज्यांना कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. 
          देशातत एकाच दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 1,573 नवीन रुग्ण समोर आले आहेत. सध्या देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजार  981 आहेत. त्याचबरोबर गेल्या 24 तासांत कोरोनाने कोणाचाही मृत्यू झाला नाही, ही चांगली बाब असलती तर केरळमध्ये सोमवारी कोरोनाने चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, 10 आणि 11 एप्रिल रोजी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे.
            कोरोना रुग्णांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याची सूचना करण्यात आली आहे. कोरोनाव्हायरस रुग्णांची दैनिक सरासरी 1.30 टक्के आहे आणि साप्ताहिक दर 1.47 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या देशात असे 32 जिल्हे आहेत, जिथे सध्या कोरोनाचा पॉझिटिव्ह दर 10 टक्क्यां पेक्षा जास्त आहे. कोरोनाने या 6 राज्यांची स्थिती चिंताजनक आहे. यावर्षी या राज्यांमध्ये 3 मार्च ते 23 मार्चमधील फरक स्पष्टपणे दिसून येत आहे.