महाराष्ट्राचा राजकारणातील निरागस नेतृत्व गिरीश बापट याचे देहावसान झाल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्याचे माजी महापौर आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज त्यांची अचानक प्रकृती खालवल्याने त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती.सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.