तळोदा दि २९(प्रतिनिधी)"तळोदा तालुक्यातील वनजमीन अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना आ.राजेश पाडवी यांच्या प्रयत्नातून लवकर सातबारे मिळतील" असे प्रसिद्धीला देण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या वनदावे/ वनपट्टे या जिल्ह्यातील वन धारकांवर शेतकऱ्यांवर पिढ्यानपिढ्या अन्याय झालाय.
अनेक सरकार आलीत,गेलीत, मात्र पिढ्यानपिढ्या अन्याय सोसणाऱ्या वनधारक/वनपट्टे शेतकऱ्यांचा समस्या सोडविण्यास यश आले नाही.
आमदार राजेश दादा पाडवी यांनी वनपट्टे वन धारकांचा समस्याच्या इथंभूत अभ्यास करत, राज्याच्या विधिमंडळात आपल्या जिल्ह्यातील अतिशय वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या समस्यांना वाचा फोडली.
विधिमंडळाच्या अध्यक्ष महोदयांच्या, समवेत सभागृहाला, नंदुरबार जिल्ह्यातील वनपट्टे वनधारक यांच्यावर पिढ्यान पिढ्या जो अन्याय झालाय या सभागृहाला लक्षात आणून दिलंय.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा नियम 105 अन्वये संबंधित महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे लक्ष वेधले असता मंत्री महोदयांनी लिखित स्वरूपात सभागृहाला इथंभूत माहिती दिली आहे
तात्काळ "प्रस्तुत प्रकरणी मार्गदर्शन मागवण्यात आलेल्या मुद्द्याबाबत आदिवासी विभाग, वन विभाग, मदत व पुनर्विसन विभाग, महसूल विभाग यांचे अभिप्राय घेण्यात येत असून शासन स्तरावर सर्वंकष विचार विनिमय करून जिल्हाधिकारी नंदुरबार यांना यथातीशिग्र मार्गदर्शन करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे"
वर्षानुवर्ष आवासून बसलेला हा प्रश्न आमदार पाडवी साहेबांच्या अथक पाठपुराव्याने, अभ्यासपूर्ण मांडणी करून सभागृहाला अवगत केल्याने ,संबंधित चारही विभागाची संयुक्त बैठक घेत या प्रश्नाला वाचा फोडत वनपट्टे धारकांना न्याय मिळणार आहे.
याच अनुषंगाने वनपट्टे धारकांची प्राथमिक बैठक आमदार पाडवी साहेबांच्या नेतृत्वात व डॉक्टर शशिकांत जी वाणी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमावल येथे संपन्न झाली.
आमदार कार्यालयाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे कार्यसम्राट आमदार राजेश दादा मतदार संघातील समस्यांना, वर्षानुवर्ष अन्याय झालेल्या समूहासाठी, शेतकऱ्यांसाठी, काबाडकष्ट करणाऱ्या मजुरांसाठी, समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी अविरतपणे झटतायेत. मतदार संघातील विकासाभिमुख कार्यासाठी राजेश पर्व समर्पित आहे.