तळोदा दि ३०(प्रतिनिधी) शहरात पालिकेच्या माध्यमातून स्वयंचलित हायमास्ट पथदिवे २०२० साली बसविण्यात आले असून सदर दिवे बसविण्यासाठी १ कोटी ५१ लाख इतक्या निधीतून तळोदा नंदुरबार रस्त्यावर तसेच चिनोदा रस्त्यावर हातोडा रस्त्यावर व शहादा रस्त्यावर चार ठिकाणी या स्वयंचलित पथदिव्यांचे काम गुरुकृपा इलेक्ट्रिकल या ठेकेदारास देण्यात आले होते दरम्यान कोट्यावधी रुपये खर्च करून देखील या स्वयंचलित पद्धतीने अधिक दिवे हे कायमस्वरूपी बंद असून संबंधित ठेका देताना अटी व शर्ती मध्ये पाच वर्षे येतो पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराला दिली असून देखील त्याकडून संबंधित यंत्रणा कडून काम करून घेणे अपेक्षित असताना संबंधित ठेकेदाराला मागील काळात पाठीमागे लपविण्यात आले आहे.
तळोदा नगरपालिका अंतर्गत व तत्कालीन स्थितीत वरिष्ठ पातळीवरून सदर कामाच्या ठेका हा देण्यात आला होता सदर ठेकेदाराला धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एका पुढाऱ्याचे आशीर्वाद असल्याचे देखील समजते याबद्दल तळोदा पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सदर ठेकेदारास या पथदिव्यांचे देखभाल दुरुस्तीबाबत तात्काळ आदेश करून हे पथदिवे सुरू करण्यात यावेत अन्यथा तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस कडून नगरपालिका येथे ठिय्या आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.
नगरपलिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या स्वयंचलित हायमस्ट पथदिवे कामांचे स्वरूप खालील प्रमाणे.....
सोलर एलइडी मिनी हायमास्ट लॅम्प बसवणे ७६,१५,०५२
चिनोदा रोड तळोदा पोल सह सोलर एलईडी स्ट्रीट लाईट.. २१,८९,३२३
हातोडा रस्त्यावर पोलसह सोलर एल.इ.डी स्ट्रीट लाईट बसवणे २८,५५,६४०
शहादा रस्त्यावर पोल सह सोलर एलईडी स्ट्रीट लाईट बसवणे
२४,७४,८८८
एकूण रक्कम 1,51,34,903 (एक कोटी एक्कावन लक्ष चौतीस हजार नवशे तीन)