Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

व हस्ती को-ऑप बँक तर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आठ गृहकर्जदारांना अनूदानचे वितरण

तळोदा दि ३०(प्रतिनिधी) 
 द. हस्ती को-ऑप बँक लि. दोंडाईचा शाखा तळोदा तर्फे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आठ गृहकर्जदारांना हाउसिंग कर्ज अनुदान मंजुर झालेले आहे म्हणून हस्ती बॅक तळोदा शाखेने गृहकर्जधारकांना पात्र लाभार्थीना अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी गृहकर्जधारकांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सबसिडीचे वितरण तळोदा दि हस्ती को. ऑप बॅकेचे स्थानिक चेअरमन किर्तीकुमार शाह समिती सदस्य अरुण मगरे ,कुशेंद्र सराफ, दिनेश चौधरी ,दिपक पटेल, प्रकाश माळी व प्रविण जैन शाखा व्यवस्थापक  किशोर चौधरी यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
           प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्यांच्याकडे घर नाही अश्या व्यक्तीना स्वतःचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सबसिडी दिली जाते या अंतर्गत हस्ती बँकेने नॅशनल हाउसिंग यांच्याशी करार करून बँकेने हाउसिंगसाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मिळणा-या हाउसिंग सबसिडीचे पात्र लाभार्थी कर्जदारांना वितरण करण्यात आले यात लाभार्थी श्री रविंद्र मराठे, पंकज कलाल, नारायण जाधव, यशोदा ठाकरे, मीता पाटील, शे.साजीद मनीयार, अब्दुलआहद शे.मनीयार, कमल जाखर, यांना अनुदान पत्र देण्यात आले
          प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यासाठी हस्ती बॅकेचे प्रसिडेंट  कैलास जैन व्यवस्थापकिय संचालक  प्रकाश कुचेरिया सरव्यवस्थापक माधव बोधवाणी, सुनिल गर्गे, कार्यकारी अधिकारी सतिष जैन यांनी प्रयत्न केले शासकिय योजनेत सहभाग म्हणुन हस्ती बँकेने विविध कर्जवारील व्याज तसेच नियम व अटी सरळ व सोपे केलेले आहेत. बँकेच्या ग्राहक व सभासदांनी व नविन घर घेणा-या ग्राहकांनी याच्या लाभ घ्यावा असे अवाहन  हस्ती बँके शाखा समितीचे चेअरमन, सदस्य, व शाखा व्यवस्थापक यांनी केले.