Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

देवमोगरा पूनर्वसन येथे बिबट्याने सात वर्षांच्या मूलावर हल्ला करून शेतात ओढून नेले.मूलगा मृतावस्थेत आढळला

  तळोदा दि ५ (प्रतिनिधी)  दि.०४.०४. २०२३ रोजी भाईदास नाहल्या वसावे रा देवमोगरा पूनर्वसन  यांनी खबर दिली की, दि.०४.०४. २०२३ रोजी सकाळी ०८:०० वाजेच्य सुमारास मी गावातील लोकांसोबत केळीच्या गाडीवर मंजुरीसाठी शहादा परिसरात गेलो होता व घरी माझी पत्नी व मुले अस शेतामध्ये घरीच होते. त्यानंतर मी रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास शेतातील घरी आलो तेव्हा गावातील हिकल्या रत्या पावरा कालुसिंग जांभ्या वसावे, कोलवर बजा-या पावरा, जांभ्या पुन्या बसावे व इतर लोक जमलेले होते त्यावेळी सुनबाई- प्रमिलाबाई गेलसिंग वसावे हिने मला सांगितले की, सायंकाळी ०६:३० ते ०७:०० वाजेच्या सुमारास मी घरात होती व घराच्या दरवाजाजवळ मुलगा दिव्या, सागर, अमित व सुरेश भाईदास वसावे वय ७ वर्ष असे जेवण करित असतांना वाघ (बिबटया) हा तेथे येवुन मुलगा-सुरेश भाईदास वसावे यास उचलुन शेतात घेवुन गेले आहे व त्याबाबत माहीती वनविभाग यांना सुध्दा कळविण्यात आली आहे असे सांगितले व त्यानंतर काही वेळाने तेथे पोलीस व वनविभाग कर्मचारी तेथे आल्याने आम्ही जमलेल्या लोकांच्या मदतीने आजुबाजुच्या शेतातमध्ये अंधरामध्ये शोध घेत असतांना घरापासून सुमारे तिनशे मिटर अंतरावर रामजी इरका पाडवी यांच्या मकाच्या शेतातमध्ये मुलगा- सुरेश भाईदास वसावे हा मयत अवस्थेत मिळुन आल्याने त्यास पाहिले असता त्यास गळ्यावर चावा घेतलेला, उजव्या हाताच्या पंजा पूर्ण | तोडलेला, उजव्या बाजुच्या कमरेच्या खालच्या भागावरुन मास खालेले च ठिका ठिकाणी चावा घेतल्याने त्यात रक्तस्त्राव होवून मयत झालेला अवस्थेत मिळुन आल्याने पोलीस, वनविभाग कर्मचारी व जमलेल्या लोकांच्या मदतीने त्यास वनविभाग यांच्या वाहनात ठेवून ग्रामिण रुग्णालय अक्कलकुवा येथे दाखल केले असता तेथील डयुटवरील डॉ. परमार यांनी तपासून मयत झाले बाबत सांगितले आहे. मयत मुलगा नामे- सुरेश भाईदास वसावे वय ७ वर्ष रा. देवमोगरा पुनर्वसन ता. अक्कलकुवा जि.नंदुरबार हा  जेवण करित असतांना त्यास वाघ (बिबटया) या हिस्त्रा प्राण्याने त्यास गळयावर चावा घेतल्याने, उजव्या हाताच्या पंजा पुर्ण खालेला, उजव्या बाजुच्या कमरेच्या खालच्या भागावरुन मास खालेले, टिका ठिकाणी चावा घेतल्याने त्यात रक्तस्त्राव होवुन मयत झाला आहे. त्याच्या मरणाबाबत आम्हाला कोणाविरुद काहीएक तक्रार अगर संशय नाही म्हणुन अक्कलकुवा पोलीस ठाणेस खबर देण्यासाठी आलो आहे वगैरे मजकुरच्या खबर वरुन मा.प्रभारी अधिकारी तात्पुरता चार्ज पोनि/नंदवाळकर सो. यांच्या तोंडी आदेशावरुन अकस्मात मृत्यु नोंद दाखल केली आहे.