Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा तालूका खरेदी विक्री संघ निवडणूक बिनविरोध

सातपुडा मिरर......
                               कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठोपाठ तळोदा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. तळोदा जि. नंदुरबार या संस्थेची निवडणूकीचा अंतिम माघारीचा दिवशी २५ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे सदर निवडणूक बिनविरोध झाली आहे.  बिनविरोध निवडीची परंपरा राखण्यात लोकप्रतिनिधीना यश आले आहे.. 
               संस्थेची व्यक्तीशा सभासद सहकारी संस्था सभासद अनुसुचित जाती/जमाती, महिला राखीव इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती/जमाती / विशेष मागासप्रवर्ग मतदार संघातील संचालक मंडळाची निवडणूक सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी साठीची निवडणुक महाराष्ट्र सहकारी संस्था ( समिती निवडणुक ) नियम २०१४ च्या नियम ३२ ला अनुसरुन पुढील नमुद केलेले उमेदवार त्यांच्या नांवासमोर नमूद केलेल्या मतदार संघातून बिनविरोध निवडून आलेले आहेत. कारण प्रत्येक जागेसाठी एक एकच उमेदवारांचे नामांकन शिल्लक राहिले होते.
१ चव्हाण पुरुषोत्तम रामदास
व्यक्तीशः सभासद मोड 
२ पटेल संजय श्रीपत व्यक्तीशः सभासद तळोदा 
३ पाटील नितीन सखाराम
व्यक्तीशः सभासद आमलाड 
४ पाटील सुरेश दत्तात्रय व्यक्तीशः सभासद
५ भापकर कांतीलाल राजाराम
व्यक्तीशः सभासद
६ भोई चंदु हरी व्यक्तीशः सभासद
७ मगरे अरुण नध्यु व्यक्तीशः सभासद
८ लोखंडे विलास कृष्णा
९ चौधरी संजिव रमेश
१०पाटील गोविंद पुरुषोत्तम
११ पाटील जितेंद्र रघुनाथ
१२ पाटील सुभाष रामदास
१३ भिल पुनमचंद ओंकारचंद
अनुसूचित जाती/जमाती
महिला राखीव
१४ पटेल आशाबाई सुभाष
१५ सागर सुरेखा मुरलीधर
१६ पाटील भरत कांतिलाल
१७ भारती अविनाश प्रल्हाद
भटकया विमुक्त अशा प्रकारे उमेदवार संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या कार्यकारणी सदस्य म्हणून निवडून आले आहेत. निवडणू निर्णय अधिकारी सचिन खैरनार यांनी निवड जाहीर केली आहे.. 
        या प्रसंगी आमदार राजेश पाडवी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी,  भरत माळी,  माजी चेअरमन गोविंद पूरूषोत्तम पाटील, डॉ शशिकांत वाणी, अरुण मगरे, माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष अनुप उदासी, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष योगेश मराठे, भाजपा शहर अध्यक्ष योगेश चौधरी, शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे, आनंद सोनार, कैलास चौधरी, संजय पटेल, किरण सुर्यवंशी आदी उपस्थित होते 
     ५४ उमेदवारांनी फॉर्म भरले होते त्यात छाननी होऊन सर्व उमेदवार पात्र झाले. त्यात दि. २१ एप्रिल पासुन ते ८ मे पर्यंत माघारीची मुदत होती. या दरम्यान ७ एप्रिल अखरे १२ उमेदवारांनी माघार घेतली होती. पहिल्या दिवसांपासूनच बैठकांचे सत्र सुरु होते. शेवटच्या दिवशी २५ उमेदवारांनी माघार घेतल्याने शेवटी तळोदा खरेदी विक्री संघ देखील बिनविरोध झाल्याने सर्वच दिग्गज पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ह्या निवडीमागे मा.आमदार उदेसिंग पाडवी, आमदार राजेश पाडवी, भरत माळी, मा.मंत्री पद्माकर वळवी, डॉ.शशिकांत वाणी यांच्या मार्गदर्शनाने बिनविरोध झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे. याशिवाय बिनविरोध झाल्याने संस्थेचा खर्च टळला असून यामुळे संस्थेचे आर्थिक चक्र स्थिर होण्यास मदत होणार आहे.