कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठोपाठ तळोदा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. तळोदा जि. नंदुरबार संस्थेचा चेअरमनपदी गोविंदभाई पाटील तर व्हाईस चेअरमनपदी पूरूषोत्तम चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
तळोदा तालूका खरेदी विक्री संघ निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार उदेसिंगदादा पाडवी, आमदार राजेशदादा पाडवी,माजी मंत्री पद्माकर वळवी,भरत माळी, डॉ शशिकांत वाणी,व इतर सर्व पक्षीय नेत्यांनी बिनविरोध निवड केली.आज दि १९ रोजी संचालक मंडळाची निवड ही बिनविरोध करण्यात आली.यांत माजी आमदार उदेसिंगदादा पाडवी यांची भूमिका महत्त्वाची होती.या संस्थेची बिनविरोध निवडीची परंपरा राखण्यात लोकप्रतिनिधीना यश आले आहे..
संचालक मंडळाची निवड सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी राहील आजच्या सभेत गोविंदभाई पाटील, पुरुषोत्तम चव्हाण, संजय पटेल, नितीन पाटील,सुरेश दत्तात्रय पाटील, कांतीलाल भापकर, चंदु हरी भोई, अरुण नध्यु मगरे,विलास कृष्णा लोखंडे, संजिव रमेश चौधरी, जितेंद्र रघुनाथ पाटील,सुभाष रामदास पाटील, पुनमचंद ओंकारचंद भिल, सौ आशाबाई सुभाष पटेल, सौ सुरेखा मुरलीधर सागर,भरत कांतिलाल पाटील, अविनाश प्रल्हाद भारती, आदी उपस्थित होते.