अक्कलकुवा प्रतिनिधी -योगेश्वर बुवा
अक्कलकुवा तालुका शेतकरी सहकारी संघाच्या
चेअरमनपदी पृथ्वीसिंग उदेसिंग पाडवी तर
व्हाईस चेअरमनपदी अशोक दौलतसिंग पाडवी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
अक्कलकुवा तालूका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत सर्व 17 सदस्य बिनविरोध झाले होते. अक्कलकुवा येथील शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयात चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी अक्कलकुवा येथील पृथ्वीसिंग उदेसिंग पाडवी यांची चेअरमनपदी तर वाण्याविहिरचे माजी सरपंच अशोक दौलतसिंग पाडवी यांची व्हाईस चेअरमन पदी सर्वानुमते निवड करण्यात आली .यावेळी विधान परिषदेचे आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमश्या पाडवी यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.अशोक पाडवी यांची व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल वाण्याविहिर गावात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.