२ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार! ३० सप्टेंबरपर्यंत नोटा बदलून घेण्यासाठी मुदत
नवी दिल्ली -
रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या चलनात असलेल्या नोटा वैध राहणार असून नव्या नोटा मात्र छापल्या जाणार नाहीत.आज १९ मे रोजी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. आर बी आय ने म्हटले आहे की,30 सप्टेंबरपर्यंत या नोटा नागरिकांना बँकेत जमा करता येणार आहेत.२३ मे पासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. एका वेळी फ़क्त १० नोटा म्हणजेच २० हजार रुपये बदलून मिळणार आहेत.ग्राहकांना २ हजार रुपयांच्या नोटा देणं तातडीने थांबवा, असे आदेश रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत. ‘क्लिन नोट पॉलिसी’च्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. भारतीय रिजर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करणार असल्याची घोषणा केलीये. मात्र, असे असले तरी २००० रुपयांची लगेचच बंद होणार नाही किंवा चलनातून बाद होणार नाही. मात्र इतर बँकांना २००० हजारांची नोट ग्राहकांना देऊ नका, अशी सूचना आरबीआयने केलेली आहे. या नोटा पुन्हा बँकेत जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंतचा कालावधी असणार आहे.