Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पापूआ न्यू गिनी च्या पंतप्रधानांनी मोदीजींचा चरणस्पर्श केला

सातपुडा मिरर......
                हिरोशिमा या ऐतिहासिक शहरात जपानच्या अध्यक्षतेखालील जी ७ देशांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर, पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनी येथील पोर्ट मोरेस्बी येथे विमानाने उतरले पण त्यांचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले गेले. त्याची चर्चा आज संपूर्ण जगात होत आहे.
             पंतप्रधान नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनी देशाच्या दौऱ्यावर आहेत. जपानहून ते तिथे थेट गेले आहेत. पापुआ न्यू गिनी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचताच 'पापुआ न्यू गिनीचे' पंतप्रधान जेम्स मारापे यांनी त्यांचे स्वागत वेगळ्या पद्धतीने केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मिठी मारून शुभेच्छा स्वीकारल्या आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही मारली.येथे ते FIPIC शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. हा त्यांचा पहिला दौरा आहे. पापुआ न्यू गिनी हा हिंद पॅसिफिक महासागरातील एक बेट देश असल्याने आणि हिंद पॅसिफिक महासागराच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ते अतिशय
 महत्त्वाचे असल्याने पंतप्रधानांच्या भेटीला महत्त्व आहे.
            पापुआ न्यू गिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताची परंपरा मोडली. साधारणपणे, सूर्यास्तानंतर येणाऱ्या नेत्यांचे औपचारिक स्वागत केले जात नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा प्रोटोकॉल मोडला गेला. पापुआ न्यू गिनी सरकारने त्यांचे अतिशय औपचारिक स्वागत केले.
              परराष्ट्र मंत्रालयाच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी पापुआ न्यू - गिनीमध्ये गव्हर्नर-जनरल सर बॉब डॅडे आणि पंतप्रधान जेम्स मारापे यांच्या भेटीसह द्विपक्षीय व्यवहार करणार आहेत. २०१४ मध्ये लाँच केलेल्या, FIPIC मध्ये भारत आणि १४ पॅसिफिक बेट देश (PICS) समाविष्ट आहेत - त्यातील फिजी, पापुआ न्यू गिनी, टोंगा, तुवालू, किरिबाटी, सामोआ, वानुआतु नियू, मायक्रोनेशियाचे संघराज्य, मार्शल बेटांचे प्रजासत्ताक, कुक बेटे, पलाऊ नाउरू आणि सोलोमन बेटे हे १४ सदस्य देश आहेत.
       पापुआ न्यू गिनी दौऱ्याची सांगता केल्यानंतर, पंतप्रधान मोदी क्वाड लीडर्सची बैठक रद्द करूनही सिडनीला जाणार आहेत. २३ मे रोजी ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत.