नंदूरबार:- मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे,राज्यात वाहतूक व विक्रीस प्रतिबंध असलेल्या विमल गुटखा व विविध प्रकारच्या सुगंधित पानमसाल्याची तस्करी करणाऱ्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी धाड टाकून चार लाख २२ हजार २४० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघां विरोधात शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात विमल गुटखा, सुगंधित पान मसाला वाहतूक व विक्रीला राज्य शासनाने प्रतिबंध केला आहे. असे असले तरी मध्यप्रदेश व गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीसाठी राजरोसपणे आणून शहरात चोरट्यापद्धतीने गुटख्याची विक्री होत असते. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पदभार स्विकारल्यानंतर काल दि.२० रोजी दुपारी शहादा-दोंडाईचा रस्त्यावर कल्याणी डेअरीसमोर विमल गुटख्याची वाहतूक करणाऱ्या योगेश गुलाब भोई व प्रकाश गुलाब भोई यांच्या ताब्यातून विक्री करीत असलेला सुमारे ७२ हजार रुपयाचा गुटखा जम केला आहे.
दुसऱ्या एका कारवाईत शहरातील मेमन कॉलनी परिसरात एका गोदामावर छापा टाकून तेथून सुमारे ३ लाख २० हजार ६३ रुपयांचा विमल गुटखा व इतर विविध कंपन्यांचे सुगंधित पान मसाला पदार्थ ताब्यात घेतला आहे.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत, पोलीस नाईक किरण पावरा, पोलीस शिपाई किरण जिरेमाळी हे शासकीय वाहनाने शहरात गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यांनी संबंधित माहितीची खात्री करून तपासणी करायला लावले. त्यावेळी त्या ठिकाणी मुद्देमाल सापडला. दोन कारवाईत सुमारे ३ लाख ९२ हजार ३०३ प्रशासनाला यश आले आहे. रुपयांचा महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे पो शि भरत उगले यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसात संशयित तौसिफ रफिक मेमन (वय २८, रा. मेमन कॉलनी, शहादा) याच्याविरोधात गुन्हा शहादा पोलिसांत ३२८,१८८, २७२,२७३,सह अन्न सुरक्षा मानके २००६ चे कलम कलम ३६(२,४)३७,(२) नूसार गून्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत व पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, पोउनि माया राजपुत तपास करीत आहेत.