Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राज्यातील सहा आमदारांना मंत्री पदाची लालूच देऊन गंडवणा-या जे पी नड्डांचे स्विय सहायक भासवणा-या तोतया पोलीसांच्या ताब्यात

 नागपूर:- 'मी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय्य साहाय्यक आहे. महाराष्ट्रात लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होत असून तुम्हाला नगर विकास मंत्रालय देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक कोटी ६७ लाख रुपये द्यावे लागतील', असे सांगून एका तोतयाने मध्य नागपूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार विकास कुंभारे यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल करून निरजसिंग राठोड नामक तोतयास गूजराथेत मोरबी येथून अटक केली आहे.मोबाइल क्रमांकाच्या आधारे नीरजचा शोध घेतला. पोलिसांचे पथक त्याला घेऊन नागपूरला घेऊन गेले आहेत.
                त्याची प्राथमिक चौकशी केली जयअसता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. नीरज कुंभारे यांच्याशिवाय नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तळोदाच आमदार राजेश पाडवी,कामठीचे आमदार टेकचंद सावकर, हिंगोलीचे तानाजी मुटकुळे, बदनापूरचे नारायण कुचे  तसेच गोवा येथील प्रवीण आर्लेकर व नागालॅण्डचे बाशा मोवाचंग यांनाही मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष दाखविले. यापैकी काहींकडून नीरज याने पैसे घेतल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे कोणीही मंत्रीपदाच्या शर्यतीत नसताना त्यांना नीरजने मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष दाखविल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
               आपण भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे खरेखुरे पीए आहोत हे पटवून देण्यासाठी नीरजने आपल्या एका साथीदारालाच नड्डा बनविले होते. त्याच्या सापळ्यात सापडलेल्या आमदाराला तो फोनवरून तोतया नड्डासोबत बोलणे करून द्यायचा. नीरजच्या सापळ्यात कोण कोण अडकले आणि किती रुपयांनी लुटले गेले पोलिस तपासातून निष्पन्न होईल.