पिक कर्जाचा बोजा सातबारा वर नोंद घेण्यासाठी १३६० रूपं लाच स्वीकारताना एकास सापळा रचून रंगेहाथ पकडण्याची कारवाई करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील तक्रारदार पुरुष,वय- ३९ रा.लासगाव ता.पाचोरा , जि.जळगाव.आलोसे भगवान दशरथ कुंभार, वय-४४ वर्ष, खाजगी इसमरा.बांबरुड, ता.पाचोरा जि.जळगाव.यांनी १,३६०/-रूपये लाचेची मागणी केली. दि १७ रोजी १,३६०/-रू.लाच मागितली व स्विकारली.आरोपीत कडून १,३६०/-रू.रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
लाचेचे कारण-यातील तक्रारदार यांची लासगाव शिवारात आईच्या नावे शेत गट क्रं.१२८/ब/१ हीचे क्षेत्र ०.९१ हेक्टर आर चौ.मी क्षेत्र असलेली शेत जमीन आहे. सदर शेतजमीनीवर तक्रारदार यांच्या आईच्या नावे बँक ऑफ बडोदा शांखा -सामनेर या बँकेकडून १,३०,०००/-रुपये पीककर्ज मंजुर करण्यात आले आहे. सदर मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदार बांबरुड तलाठी कार्यालयात गेले असता सदर कार्यालयात उपस्थित वर नमुद खाजगी इसम यांनी तक्रारदार यांना माझे तलाठी अप्पांशी चांगले संबंध आहेत तुमच्या आईच्या नावे मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर लावण्याचे काम तलाठी अप्पांकडून करून आणून देतो असे सांगुन सदर कामासाठी तक्रारदार यांच्या आईचे तक्रारदार व साक्षीदाराचे आधारकार्ड झेरॉक्स व आईचे ३ व तक्रारदार यांचे २ पासपोर्ट फोटो सांगितले.व सदर खाजगी इसम यांनी तक्रारदार यांचे कडे पंचासमक्ष आईच्या नावे मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर लावण्याचे काम तलाठी अप्पांकडून करून आणून देण्याच्या मोबदल्यात १,३६०/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाच रक्कम आरोपी यांनी बांबरुड येथील त्यांचे स्वतःचे घरी पंचासमक्ष स्वतःस्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाटील,पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव,सापळा व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक श्रीमती.एन.एन.जाधव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव.सापळा पथकातपो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने.कारवाई मदत पथक पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव,लाप्रवि जळगाव,स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.मार्गदर्शन श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र एन.एस.न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक
नरेंद्र पवार वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, याचे मार्गदर्शन लाभले.