शिरपूर दि २२(प्रतिनिधी)
शिरपूर शहर पो.स्टे. डी. बी. पथकाने दोन चोरट्यांकडुन एकुण २,८०,०००/- रू. किं.च्या ६ मो.सा. हस्तगत केल्या आहेत
शिरपूर शहर पो.स्टे. गु.र.नं. १८४/२०२३ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्यातील फिर्यादी हेमंत अनिल भोई वय-२९ व्यवसाय नाश्ता दुकान रा. आदर्श नगर, शिरपूर जि. धुळे यांनी फिर्याद दिली को. दि. २०/०२/२०२३ रोजी सायं. ५.३० ते रात्री १०.३० वाजेचे सुमारास शिरपूर जि. धुळे शहरातील खंडेराव महाराज मंदिराचे समोरील रत्यावर त्यांनी त्यांचे मालकीची होंडा कंपनीची सी. बी. यूनिकॉर्न मो.सा. क्र. एम.एच.१८./बी.एस. १९३०- हि उभी केली असता ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने चोरून नेले बाबत दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. ए. एस. आगरकर शिरपूर शहर पो.स्टे. यांनी डी. बी. पथकाचे पोलीस अंमलदार यांचे मार्फतीने तपासचक्रे वेगाने फिरवून डी. बी. पथकास २ संशयीत इसम नामे १) संतोष विठ्ठल हटकर वय ३३ रा. क्रांती नगर, शिरपर जि. धुळे व २) रितेश सुरेशसिंग जमादार वय २७ रा. सातपुर, नाशिक ह.मु.क्रांती नगर शिरपूर जि.धुळे असे क्रांती नगर मध्ये सी. बी. यूनिकॉर्न मो.सा. बर संशयीतरित्या फिरतांना मिळून आल्याने त्यांना विचारपूस करता त्यांनी सदरची मो.सा. खंडेराव महाराज मंदिराजवळून चारी केल्याची कबुली देवून त्यांनी आणखी इतर ठिकाणी चोरी केलेल्या एकुण ५ मो.सा, वर नमुद इसम संतोष विठ्ठल हटकर याचे घराजवळ लावलेल्या मिळून आल्याने सदरच्या मो.सा.सह त्यांचेकडुन एकुण ६ मो.सा. जप्त करण्यात आल्या असून त्यांचे वर्णन खालील प्रमाणे.
५०,०००/हजार किमतीची-होंडा कंपनीची सी.बी. युनिकॉर्न मो.सा.राखाडी रंगाची ME3TEA1125962
४०,०००/- रु. कि.ची होंडा कंपनीची एच.एफ. डिलक्स मो.सा. काळ्या रंगाची तीचेवर लाल व सिल्व्हर पट्टे असलेली
२४०००/- रु.कि.ची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मो.सा. काळ्या रंगाची तिचे वर निळे व सिल्व्हर रंगाचे पट्टे असलेली
२५००० रू किंमतीची 05L16C43762 इंजिन नंबर KC31EA1125962 JC36E73888235
४०००० हजार किमतीची हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स काळ्या रंगाची तिचेवर लाल व सिल्हर रंगाचे पट्टे असलेली
MBLHATIAEE9E29423 HALIEFE9E28032
होंडा कंपनीची शाईन मो.सा. काळ्या रंगाची लाल व सिल्व्हर पट्टा असलेली मो.सा. चे वर्णन चेचीस नंबर वरप्रमाणे एकुण ६ मो.सा. सदर इसमांकडुन जप्त करण्यात आल्या असून सदर मो.सा. बाबत गुन्हे दाखल असून ते खालील प्रमाणे,
१) होंडा कंपनीची सी. बी. युनिकॉर्न मो.सा. क्र. एम.एच.१८./बी.एस.११३० बाबत शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं १८४/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
२) हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मो.सा. बाबत शिंदखेडा पो.स्टे. गुरनं. १०६/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे वरप्रमाणे २ गुन्हे उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगीरी करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यात जप्त इतर मो.सा. बाबत गुन्हे दाखल आहेत अगर कसे याअनुषंगाने तपास सुरु असुन सदर गुन्ह्याचा तपास पोनि ए.एस. आगरकर यांचे मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाचे पोहेकॉ /लादूराम चौधरी करीत आहेत. सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. संजय बारकुंड, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. ए. एस. आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पो.स्टे. चार्ज उप विभागीय अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर. जी. बी. पथकाचे पोहेकॉ/ललीत
पाटील, लादूराम चौधरी, पोना/मनोज पाटील, पोकों/विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, प्रविण गोसावी,मनोज दाभाडे, सचिन वाघ, भटू साळुंके तसेच होमगार्ड मिथुन पवार व राम भिल अशांनी मिळून केली आहे.