आदिवासी शेतकऱ्यांना शेती अवजारेसाठी मंजूर अर्थसहाय्य देण्यास टाळाटाळ
अधिकाऱ्यांकडून बोगस बीले व अपूर्ण शेती साहित्य खरेदीची कारणे.परंतु,ज्या शेतकऱ्यांनी उसनेवारीने पैसे घेऊन खरच शेती साहित्य खरेदी केले; त्याचे काय?बिरसा फायटर्स सवाल.
तळोदा दि ३ (प्रतिनिधी) आदिवासी विभागातंर्गत २०१८-१९ या वर्षासाठी शेतकऱ्यांना शेती अवजारेसाठी अर्थसहाय्य निधी मंजूर आहे.आदेश देऊन १५ महिने उलटली.योजनेसाठी तळोदा प्रकल्पातंर्गत निवड झालेले लाभार्थी तळोदा २७,अक्कलकुवा ४७, धडगांव ४२ असे एकूण ११६ पात्र लाभार्थी आहेत.अनेक पात्र लाभार्थ्यांनी स्वतःचा पैशानी,काहीनी उसनवारीने पैसे घेऊन शेती साहित्य खरेदी केले आहे.परंतु,संबंधित प्रशासन बोगस बिले,अपूर्ण साहित्य खरेदी असे कारणे देत अद्यापही कोणत्याही शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिले नाही.तसेच,आदिवासी शेतकऱ्यांना शेतीसोबत शेळी पालन करून आर्थिक विकास होण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय शेळी गट योजना आदिवासी विकास विभागातंर्गत राबवली जाते.तळोदा प्रकल्पातंर्गत शेळी गट पालनासाठी २७८ लाभार्थ्यांची निवड झाली आहे.त्यांनाही अद्यापही लाभ मिळाला नाही.संबंधित विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात.गरीब आदिवासी विविध कागदपत्रे गोळा करून ५०० ते ६०० रू.खर्च करून योजना मिळेल या आशेने अर्ज करतो.परंतु,अर्ज करून काही वर्षेही लोटली जातात तरी योजना गरीब आदिवासींना मिळत नाही हे अतिशय दुर्दैव आहे.योजना पारदर्शकपणे राबवून गरीबापर्यत पोहचणे आवश्यक आहे.दोन्ही योजनेचा लाभ निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळावा यासाठी बिरसा फायटर्सने प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री,आदिवासी विकासमंत्री यांना निवेदन पाठवून मागणी केली आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी, तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष जिल्हा सल्लागार अड.गणपत ठाकरे,जिल्हा निरीक्षक सुभाष पाडवी,तालुका कार्याध्यक्ष किरण पाडवी,सचिव सुरेश मोरे, रोझवा पुनर्वसन शाखाध्यक्ष बारक्या पावरा,धजापाणी शाखाध्यक्ष डोंगरसिंग पावरा,खर्डी बु!!उपाध्यक्ष गुलाबसिंग पाडवी,हेमंत ठाकरे,दिवाण वळवी,प्रवीण पाडवी,अरुण पाडवी,दादी पाडवी यांच्या सह्या आहेत.