Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बुऱ्हानपूर-अंकलेश्वर महामार्गावर तळोदा ते रावेर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी ६१ कोटी निधी मंजूर, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे

बुऱ्हानपूर-अंकलेश्वर महामार्गावर तळोदा ते रावेर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी ६१ कोटी निधी मंजूर, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे 
तळोदा:- बुऱ्हानपूर-अंकलेश्वर महामार्गावरील एनएच७५३बी तळोदा जंक्शन जवळ सुरु होणारा तळोदा - शिरपूर - चोपडा - यावल - फैजपूर - सावदा – रावेर या मध्यप्रदेश महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या २३२ किमी महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी रु.६१.०० कोटी निधी मंजूर झाला असून, त्याबाबत निविदा प्रकाशित झालेली आहे, अशी माहिती खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे.
              ब-हाणपूर -अंकलेश्वर महामार्गाच्या दर्जावाढ व चौपदरीकरणसाठी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांचा मागील काही वर्षापासून केंद्र व राज्य स्तरावरील संबंधित मंत्री यांच्याकडे निरंतर पाठपुरावा सुरु होता, त्यानुसार मागील वर्षी सदर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आलेले असून, सध्या ह्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी वितरीत करण्यात आलेला असून, पुढील टप्यात चौपदरीकरणसाठी डीपीआर बनून जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिली.