Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अक्राणी व बिलगाव वनक्षेत्रात उपवनसंरक्षक के बी भवर यांच्या उपस्थितीत "मिशन लाईफ"अंतर्गत कर्मचारी यांना पर्यावरण प्रतिज्ञा व वृक्षारोपण करण्यात आले.

म.उपवनसंरक्षक के.बी.भवर नंदूरबार हे अक्राणी व बिलगाव वनक्षेत्राच्या क्षेत्रीय दौऱ्यावर आले असताना महाराष्ट्र शासनाच्या "मिशन लाईफ " चा कार्यक्रम घेण्यात आला.त्यातंर्गत त्यांच्या उपस्थितीत सर्व प्रथमअक्राणी व बिलगाव वनक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांना पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा देण्यात आली.त्यानंतर वनक्षेत्राच्या आवारातील केरकचरा व पर्यावरणास हानिकारक प्लास्टिकच्या वस्तू गोळा करून नष्ट करण्यात आल्या.    तसेच कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
             यावेळी श्री.भवर साहेब यांनी उपस्थित वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांना प्रत्येक नियतक्षेत्रात जाऊन ग्रामस्थ, विद्यार्थी, यांना पर्यावरण जनजागृती बाबत मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.सदर  कार्यक्रमास सहाय्यक वन संरक्षक गणेश मिसाळ ,.वनक्षेत्रपाल अक्राणी सौ .सी.ए .काटे  यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीते करिता वनपाल माकडकुंड बी.एम.परदेशी, वनपाल भूषा डी.आर.केळकर, वनपाल भादल आर.ए.ठाकरे,श्रीमती पी.जे.बोरसे,एम.एस.त्रिमाळी, वनरक्षक ए. एस. पाडवी, जी.बी .तडवी, एम. एम. वळवी, एच .एम.  तडवी, आर .झेड .पावरा, श्रीमती जे .एम.वळवी, एस .बी .भंडारी,ए .के .पावरा, श्रीमती पी.जे .पावरा,एम.एन.पावरा , वनमजूर भिका पाडवी,बारदा पटले,रेल्या पावरा, शिवाजी पाडवी,खात्या पाडवी यांनी प्रयत्न केले.