Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हूतात्मा चाफेकर बंधूंच्या स्मारकासाठी ४१ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देणार - मूख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि२२
            भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी वीर हुतात्मा चापेकर बंधूंनी रँड या क्रूरकर्मा ब्रिटीश अधिकाऱ्याचा वध केला. अशा वीर क्रांतिकारक बंधूंच्या तेजाला साजेसे स्मारक पिंपरी चिंचवड येथे उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे. 
          क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारकाच्या कामाबाबत मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आप्पासाहेब बारणे यांच्या पुढाकाराने बैठक बोलवली होती.
          यावेळी सदर स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी ४१ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केले.
       क्रांतिकारी चापेकर बंधूचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले.

बैठकीस आमदार अश्विनी जगताप, महापालिका आयुक्त शेखर सिंह, चापेकर समितीचे गिरीष प्रभूणे, मिलिंद देशपांडे, रविंद्र नामदे, अमोल थोरात, गोरडे आदी उपस्थित होते.