तळोदा येथील कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग तर्फे सरदार वल्लभ पटेल व श्रीमती इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
आज दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 रोजी देशाचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान दिवंगत इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी, या निमित्ताने महाविद्यालयात या दोघं महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण माजी प्राचार्य डॉ एस एन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. शपथ चे वाचन डॉ पराग तट्टे यांनी केले तसेच डॉ जे एन शिंदे सर यांनी सरदार वल्लभ पटेल व श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जीवनपटा विषयी व केलेल्या महान कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली कार्यक्रमास विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ एम एच माळी डॉ एस बी गरुड डॉ एम ए वसावे डॉआर डी मोरे डॉ एस आर चव्हाण भाऊसाहेब केदार व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते