अक्कलकुवा तालुक्यातील वेली येथील माजी पंचायत समिती सदस्य व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले वाण्या दौल्या वळवी यांची अक्कलकुवा तालुका आदिवासी काँग्रेस तालुका अध्यक्षपदी नुकतिच नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या संमतीने व अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्या आदेशान्वये नंदुरबार जिल्हाध्यक्ष आर. सी. गावित यांनी एका पत्रान्वये ही नियुक्ती केली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वेली येथील वाण्या दौल्या वळवी हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात कार्यरत असून ते तालुक्यातील आदिवासींच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी विविध कार्यकारी सहकारी संस्था वेली चे अध्यक्ष , वेली ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून धुळे जिल्हा असताना काम पाहिले आहे .त्यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त केले असून त्यांना सोपविण्यात आलेल्या जबाबदारी बाबत पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाला खरा उतरत तालुक्यातील आदिवासींसह विविध घटकांना संघटित करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार असून जिल्ह्यातील पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेईल असे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले .
यावेळी सिंदुरी ग्रामपंचायतचे सरपंच लालसिंग सिमजी वसावे , ग्रामपंचायत सदस्य वसंत वसावे, कारभारी सिमजी वसावे, ग्रामपंचायत सदस्य नितीन वसावे उपस्थित होते.