Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमच्या वास्तव्याची जमीन कधी देता*?(जुन्या केवडी ग्रामस्थांची व्यथा) प्रशासनाला सवाल

आमच्या वास्तव्याची जमीन कधी देता*?(जुन्या केवडी ग्रामस्थांची व्यथा)

अक्कलकुवा दि ३ (प्रतिनिधी)अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारी शिवारालगत केवडी गाव होते.केवडी गाव वास्तव्यासाठी परत मिळावे; यासाठी अक्कलकुवा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,पूर्वीपासून आमचे गाव आमलीबारी शिवारालगत केवडी गाव होते.आजही शासन दप्तरी केवडी गावठाण म्हणून उतारा निघत आहे.गावठाण हा आमचा पुर्व परंपरागत अधिकार आहे.गावठाण व गावातील जागा ही महसूल कायद्याचे कलम १२२ अन्वये निश्चित केलेले आहे.आजही तेथील जमीन निवासासाठी असल्याने जमीन महसूल आकारला जात नाही.वन विभागाने अज्ञानाचा फायदा घेऊन तेथून हाकलून लावले.तेव्हापासून केवडी ग्रामस्थ आपल्या नातेवाईकांच्या आश्रयाला आमली,दाब,आमलीबारी,आंबी येथे राहतात.परंतु,प्रत्येकांची कुटुंब संख्या वाढल्याने जागेचा प्रश्न निर्माण होऊन नातेवाईकांच्या गावात राहणे कठीण होत आहे.जुन्या गावासाठी सन २००९ पासून सतत शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे.परंतु,गेल्या चौदा वर्षापासून प्रशासन फक्त आश्वासन देऊन अन्याय करत आहे.वास्तव्यासाठी जमीन परत मिळावी.अन्यथा,लवकरच तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर अर्जुन नाईक,मोहन नाईक,बिरसा फायटर्स अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,गौतम नाईक,रविंद्र पाडवी,राजू नाईक,रामदास नाईक,धरमसिंग पाडवी,किसन नाईक,लालसिंग पाडवी,प्रतापसिंग पाडवी,बिज्या वळवी,टेडगा पाडवी,विज्या पाडवी,किसन पाडवी,दमण्या वळवी अशा ३० ते ३५ अन्यायग्रस्त ग्रामस्थांच्या सह्या आहेत.