Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बुडकी ता शिरपूर ग्रामपंचायत मधील रिक्त लिपिक पदत्वरीत भरण्यात यावे जितेंद्र पावरा यांची मागणी

बुडकी ग्रामपंचायत मधील रिक्त लिपिक पदत्वरीत भरण्यात यावे जितेंद्र पावरा यांची मागणी
शिरपुर दि ३ (प्रतिनिधी)तालुक्यातील बुडकी ग्रामपंचायत ला मागिल काही महिन्यापासून लिपिक पद हे रिक्त असल्याने ग्रामस्थांना कामे करण्यास अडचण येत असलेल्या जितेंद्र पावरा यांनी ग्रामपंचायत ला ग्रामसेवक व सरपंच यांच्या कडे रिक्त पद त्वरित भरण्यात यावे असे अर्जाद्वारे मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, बुडकी ग्रामपंचायत मधील लिपीक हे पद मागिल काही महिन्यांपासून रिक्त असल्याने ग्रामपंचायत मध्ये विविध शासकीय कामे, तसेच दाखले साठी जात असल्याने लिपीक हे पद रिक्त असल्याने आम्ही हे काम करु शकत नसल्याचे कर्मचारी कडुन ग्रामस्थांना सांगण्यात येते असल्याने ग्रामस्थांचे अडचण येते असल्याने ग्रामपंचायत मधील रिक्त लिपिक पदत्वरीत भरण्यात यावे म्हणून वारंवार ग्रामपंचायत ला सुचना देऊन व वारंवार बैठक घेऊन सुध्दा हि रिक्त पद भरण्यात आले नसल्याने गावातील नागरिकाचे मोठा प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या असल्याने आपणांस विनन्ती आहे सदर भरती बाबत ग्रामपंचायत स्थळावर भरती प्रक्रिया ची जाहिरात काढुन रिक्त असलेले पद लवकर लवकर भरण्यात यावे तसचे 8 दिवसांचा आत भरती प्रक्रिया बाबत जाहीर काढण्यात आली नाही तर पुढिल स्तरावर मागणी करण्यात येणार असे निवेदनात म्हटले आहे....