Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सरला नगरातील अवैध बांधकामावरुन हिंदुत्ववादी संघटनांचे पालिकेत ठिय्या आंदोलन सुरू, धार्मिक तेढ निर्माण झाल्यास जबाबदार कोण?

तळोदा दि १२ (प्रतिनिधी)सरला नगर तळोदा येथे घराच्या बांधकामाच्या नावावर धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा संशयावरून हिंदुत्ववादी संघटनांनी पालिकेत जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेत आंदोलन सुरू केले आहे.
सरला नगरातील अवैध बांधकामामुळे गावातील दोन समाजातील तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ह्या संबंध तक्रारी कोणा कडे करणार या साठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
      आंदोलकांनी म्हटले आहे की,पालिकेला प्रभारी मुख्याधिकारी आहे,लक्ष द्यायला सक्षम अधिकारी नाही.काही झाल्यास सबधित अधिकारी जबाबदार असतील.

                तळोदा शहराचे प्रश्न कोण सोडवणार ? या साठी तळोदा नगर परिषद येथे जो पर्यंत प्रभारी अधिकारी येणार नाही तो पर्यंत आम्ही समस्त हिंदुत्ववादी संघटना आंदोलनाला बसलो आहे.असे सोशल मीडियावर जाहीर करत ,प्रभारी अधिकारी येणार नाही तो पर्यंत अंदोलन मागे घेणार नाही.असा पवित्रा घेत आंदोलन सुरू केले आहे.