Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मध्यप्रदेश सीमेवरच्या महाराष्ट्राच्या शेवटच्या अतिदुर्गम भादल गावाला संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच मिळाला पक्का रस्ता

मध्यप्रदेश सीमेवरच्या महाराष्ट्राच्या शेवटच्या अतिदुर्गम भादल गावाला संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच मिळाला पक्का रस्ता

नंदुरबार दि १०(प्रतिनिधी) तोरणमाळ पासून खालच्या भागातील नर्मदा काठच्या भादल या महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या दुर्गम गावाला संसदरत्न खासदार डॉक्टर हिना ताई गावित यांनी भेट दिली आणि स्वातंत्र्यानंतर च्या 75 वर्षांनी प्रथमच या दुर्गम भागात बनत असलेल्या पक्क्या रस्त्याची पाहणी केली. या गावात प्रथमच कोणी उच्चपदस्थ राजकीय व्यक्ती आमच्याशी संवाद साधायला आला, अशी प्रतिक्रिया याप्रसंगी स्थानिक ग्रामस्थांनी दिली. 

तोरणमाळ पासून खाली जाणाऱ्या दरीच्या दिशेने उतरल्यानंतर पुढे आणखी अनेक गाव पाडे स्वातंत्र्यपूर्व काळापासून वसलेले आहेत. अनेक सरकार आले गेले बदलले परंतु तिथपर्यंत न रस्ते बनले ना कोणते वाहन पोहोचले. उडद्या ते भादल पर्यंत 56 किलोमीटरचे अंतर स्थानिक रहिवाशांना कायमच पायी चालून पार करावे लागत आहे. 2014 यावर्षी खासदार डॉक्टर हिना गावित या प्रथमच भारतीय जनता पार्टीतून निवडून आल्या आणि त्यांनी सर्वप्रथम या भागात रस्ता मंजूर केला. वनविभागाच्या कायदे नियमांचे अडथळे आणि अडचणी यामुळे रखडलेले ते काम आता वेगाने पूर्ण केले जात असून सातपुडा च्या पायथ्याशी मध्य प्रदेश सीमेपर्यंत डोंगराळ भागातील पहिला रस्ता आकाराला येत आहे. त्याची पाहणी संसद रत्न खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी केली. याला निमित्त होते भादल या गावात श्री शंकर आदिवासी विकास बहुउद्देशिय संस्था, धनाजे बु., ता.धडगांव आणि श्वेता रूरल फाऊंडेशन, धडगांव यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या "एकच ध्यास सामाजिक विकास" कार्यक्रमांतर्गत संसदरत्न खासदार डॉ. हिनाताई गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रियाताई गावित यांच्या हस्ते साहित्य वाटपाचे. 

तोरणमाळ पासून खालच्या भागातील गाव पाडे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ते वीज पाणी आणि अन्य सुविधांपासून वंचित राहिले. ही मोठी दुरावस्था आहे. परंतु ही सर्व स्थिती पालटण्यासाठीच मी खासदार बनले असून भादल गावासह नर्मदा काठच्या महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या दुर्गम गावांपर्यंत नर्मदेचे पाणी आणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारी योजना राबवली जाईल, बारमाही पक्के रस्ते देण्याबरोबरच या भागात वीज खांब देऊ तसेच येथील कुणाच्या घरात राहणाऱ्यांना पक्की घरे दिली जातील; अशी ग्वाही संसद रत्न खासदार डॉक्टर हिना ताई गावित यांनी यावेळी दिली. पाहणी करताना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, भाजपाचे तालुका अध्यक्ष हिरा पाडवी, सामाजिक कार्यकर्ते सुभाष शंकर पावरा, माजी नगराध्यक्ष लतेश मोरे, सौ. सुरेखा लतेश मोरे, एडवोकेट जयश्री गावित, ॠषा गावित, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पराडके, नंदुरबार येथील भाजपाचे संतोष वसईकर, माजी गटनेते आनंदआण्णा माळी, मांगूभाऊ माळी, भादल ग्रामपंचायत सरपंच बुरकाताई पावरा, सिंधी दिगरचे सरपंच संदीप पावरा व अन्य उपस्थित होते.