Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशिक व्यवस्थापकीय संचालक श्रीमती.लीना बनसोड यांची अधिकाऱ्यांसह मशरूम युनिटला भेट

अक्कलकुवा दि 3 (प्रतिनिधी) देव मोगरा पुनर्वसन ता.अक्कलकुवा जि. नंदुरबार येथे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशिक व्यवस्थापकीय संचालक श्रीमती.लीना बनसोड श्री.विकास वळवी महामंडळ संचालक नंदुरबार व अन्य अधिकाऱ्यांसह मशरूम युनिटला भेट दिली.
      मशरूम शेतीची माहिती घेत मशरूम शेतीला लागणारे वातावरण बद्दल मशरूम शेतीचे मार्गदर्शक श्री.राजेंद्रजी वसावे यांनी सातपुड्यात 12 महिने चालणारी ही मशरूम शेती असून या भागातील मौलमजुरी साठी स्थलांतर करणारे स्त्री व पुरुष व युवा वर्ग यांना आपल्या राहत्या घरात मशरूम शेती करून आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करू शकतात देव मोगरा पुनर्वसन या गावात आता एकमेकांना पाहून मशरूम शेतीची वेगवेगळे ठिकाणी होत आहे मशरूम शेती ते मार्केटिंग कसे करावे ते आम्ही सर्व ट्रेनिंग मध्ये शिकवली जाते.
परिपूर्ण मशरूम शेती करण्यासाठी वर्षातील प्रत्येक ऋतुच्या अनुभव झाला की यशस्वी मशरूम शेती करू शकतात अशी माहिती वसावे यांनी दिली.
श्रीमती.लीना बनसोड व अधिकाऱ्यांना वसावे यांचे काम करण्याचे रूप रेषा पाहून शबरी महामंडळातून वैयक्तिक अर्ज सादर करून मशरूम शेतीला लागणारे पैकहाऊससाठी योजना मशरूम शेती करणाऱ्यांना देता येईल असं नाशिक हुन आलेले अधिकाऱ्यांनी सांगितले.