सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि २६
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा वडगाव शेरी च्या वतीने भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते महिला पदाधिकाऱ्यांना पदनियुक्ती पत्राचे वाटप केले. तसेच नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शेकडो महिला भगिनींचा भाजपा महिला मोर्चात पक्षप्रवेश झाला. या भगिनींनी समर्पण भावनेतून पक्षकार्यात वाहून घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. नजिकच्या काळात देशाच्या दृष्टीने महत्त्वाची निवडणूक होत असून या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्यासाठी सर्वांना झोकून देऊन काम करावे, असे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक,माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, भाजपा प्रदेश सरचिटणीस महिला मोर्चा स्वातीताई शिंदे, शहराध्यक्षा महिला मोर्चा हर्षदा फरांदे,अर्जुन जगताप, मंगेश गोळे,माजी नगरसेविका मुक्ता जगताप, ऐश्वर्या जाधव, ज्योती जवळकर, कविता मुडविकर, रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे, राजू केसरकर , भावना शेळके, खुशी लाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.