८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माळी समाज सुरत,गुजरात च्या वतीने आई सावित्रीच्या लेकींचा सन्मान करण्यात आला.
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विशेष....! व आई,कन्या,बहीण, मैत्रीण,पत्नी, सून,वहिनी, मावशी,आजी,अशा विविध रूपांच्या नवरंगांनी सजलेल्या स्त्रीला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
उत्तुंग तुझ्या भरारी पुढे गगन ही ठेंगणे भासावे...!
तुझ्या विशाल पंखाखाली अवघे विश्व बसावे....!
सर्वप्रथम कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व कर्तुत्ववान महिलांच्या हस्ते ज्ञानज्योती,क्रांतिज्योती आई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले व त्यांच्या आशीर्वादाने तसेच ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माळी समाज सुरत,गुजरात च्या वतीने आई सावित्रीची कन्या सुरत माळी समाजाच्या विविध शैक्षणिक, सामाजिक,राजकीय,अध्यात्मिक,आर्थिक,औद्योगिक,वैद्यकीय व कायदेकीय या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा स्वाभिमान व स्त्री शक्तीचे कौतुक व सन्मान करण्यात आला. तसेच महिला सशक्ती करण क्षेत्रात समाजातील महिलांना पुढे येण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देण्यात आले. सदर कार्यक्रमाला माळी समाजातील विविध शैक्षणिक,सामाजिक, राजकीय,अध्यात्मिक, आर्थिक,औद्योगिक,वैद्यकीय व कायदेकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान बंधू-भगिनींनी व विशेष मान्यवरांनी उपस्थिती दिली.
शब्दांकन - प्रा.श्री.विलास देवाजी माळी,सर
सुरत जिल्हा संपर्क प्रमुख
अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ कार्यक्षेत्र-भारत देश शाखा गुजरात राज्य