यावेळी मुख्याध्यापक निमेश सूर्यवंशी यांनी लाभार्थी मुलींना सायकली वरून शाळेत ये- जा करतांना रस्त्यावर आवश्यक काळजी घ्यावी याबाबत खबरदारी चे आवाहन करून रस्ता सुरक्षा बाबत महत्त्व विशद केले. यावेळी शिक्षक वर्ग - रमाकांत चौधरी , वसंत मराठे , देविदास मराठे , साहेबराव पाटील , रुख्मिणी माळी , संजय तनपुरे तसेच पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राम सूर्यवंशी यांनी केले , कल्पेश मराठे , महेंद्र सूर्यवंशी व चंद्रकांत कर्णकार या शिक्षकेतर बंधूंनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.
माध्यमिक विद्यालय तळवे ता. तळोदा शाळेत मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकलींचे वाटप
April 03, 2024
तळोदा दि ३ (प्रतिनिधी) माध्यमिक विद्यालय तळवे ता. तळोदा शाळेत मानव विकास मिशन अंतर्गत संस्थेचे अध्यक्ष चेतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांच्या मंजुरीने शाळेचे मुख्याध्यापक निमेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या आणि शाळेतील सर्व वरिष्ठ शिक्षक यांच्या हस्ते एकूण 22 लाभार्थी मुलींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.