Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आदिवासींच्या हृदयावर राज्य करणारा, एकमेव नेता माजी मंत्री अँड पद्माकर वळवी

तळोदा दि ८ (प्रतिनिधी)  अक्राणी अक्क्लकुवा विधानसभा मतदारसंघात अँड पद्माकर वळवी तरुणांच्या हृदयात, सोशल मीडियावर बाजु मांडुन मतपरिवर्तन केले जाते आहे.
आदिवासी नेतृत्व म्हणून त्यांचे गोडवे गायले जातात,मुलं शिकावी म्हणून, शहरात हॉस्टेल व्हावीत यासाठी भांडणारा,आदिवासी मुलांना पुणे मुंबईत चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रवेश मिळावा, वस्तीगृहे निर्माण करणारा विद्यार्थ्यांचा मित्र,आदिवासी युवक शिक्षण घेऊन नोकरीला लागावा म्हणून युवकांना योग्य मार्गदर्शन करून व्यक्तिमत्व विकासाचे धडे देणारा, स्पर्धा परीक्षा द्यायला सांगणारा व्यक्ती,बोगस आदिवासी विरोधात महाराष्ट्रभर लढा उभा करणारा व प्रसंगी सरकारच्या विरोधात जाऊन आदिवासींची बाजू मांडणारा नेता,आदिवासींचे आरक्षण घटनात्मक असून त्याच्यावर अतिक्रमण म्हणजेच आदिवासींवर अतिक्रमण असे सांगून आदिवासींची भक्कम बाजू मांडणारा ढाण्या वाघ,प्रसंगी पराभूत झाला पण आदिवासींची बाजू ज्यांनी कधीच सोडली नाही,
सदैव जनतेत लोकांच्या मदतीला धावून येणारा व हाकेला ओ देणारा दिलदार माणूस,आदिवासी अस्तित्वासाठी ज्यांनी पक्ष सोडले व आदिवासी समाजाची इमान राखलं,सातपुडा निसर्गसंपन्न व्हावा यासाठी झाडे वाटणारा व आदिवासींना वनहक्क मिळावे म्हणून भांडणारा नेता,आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींनी बळकवल्या त्या आदिवासींना पुन्हा मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारा लढवय्या नेता,
सातपुड्यात आदिवासींच्या हक्कासाठी सदैव लढणारा एकमेव नेता,आदिवासींना स्वतःचे राजकीय अस्तित्व असायला पाहिजे असे आवर्जून सांगणारा नेता,
असंख्य आले असंख्य गेले परंतु आदिवासींच्या हृदयावर राज्य करणारा एकमेव नेता, सातपुड्याचे नेतृत्व करायला आणि विधानसभेत आदिवासींचा आवाज म्हणून गर्जना करायला निवडणुकीत भारत आदिवासी पार्टी कडून उमेदवारी करत आहे त्या पद्माकर वळवीला, आदिवासी समाज व समाज हिताला प्राधान्य देऊन आमच्या बेरोजगार व सुशिक्षित युवकांची आर्जव समाजाने लक्षात घ्यावी अशी आर्जवे केली जाते आहे.