Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एकलव्य मॉडेल आश्रम शाळा मधील संशयास्पद आत्महत्येची सखोल चौकशी कर-ा विश्व आदिवासी सेवा संघटनेचे निवेदन

सातपुडा मिरर न्युज नेटवर्क दि ५
एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये झालेल्या संसयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करून कडक कार्यवाही करावी प्रकल्प अधिकारी नंदूरबार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा शहादा तालुक्यातील मोहिदा येथील एकलव्य मॉडेल स्कूल मधील एका आठवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याचे दुखद घटना घडले जिल्ह्यातील आश्रम शाळेत वारंवार संशयास्पद मृत्यू व आत्महत्या चे घटना घडत आहेत याला जबाबदार कोण विद्यार्थिनी ने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली इतक्या अल्पवयामध्ये सदर मुलीने आत्महत्या करण्यामागे नेमके कारण काय होते याबाबत पोलीस तपास किंवा पोलीस तपासातून अजून काही निष्पन्न झालेले नाही परंतु सदर मुलीने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत सर्व आदिवासी समाजामध्ये आक्रोश निर्माण झाले आहे मुलीच्या आत्महत्या मागे काही षडयंत्र आहे का किंवा सदर मुलीला शालेय प्राध्यापक प्राचार्य शिक्षक किंवा शिक्षक इतर कर्मचारी यांच्यापासून काही धोका किंवा यांच्यापासून काही त्रास होता का?
 याबाबत तपास करणे अनुषंगाने गरजेचे आहे सदर प्रकरणातील प्रत्येक निरीक्षणाची नोंद घ्यावी तसेच पीडित कुटुंबाला योग्य तो न्याय मिळावा . आपल्या स्तरावर योग्य तिकडं कार्यवाही करावी ही सर्व आम्हा आदिवासी समाज बांधवांमार्फत विनंती आहे या वेळी निवेदन देताना विश्व आदिवासी सेवा संघटनेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष जितेंद्र टी बागुल, केंद्रीय सचिव संभाजी आर जगताप, केंद्रीय सहसचिव विनायक गावित, सामाजिक कार्यकर्त्या मालती डी वळवी, केंद्रीय सल्लागार ॲड कोमल जे पावरा, धडगाव तालुका सल्लागार ॲड गीतांजली वाय पाडवी, केंद्रीय सदस्य सुभाष जी कोकणी, केंद्रीय सदस्य सोनू एस कोकणी, महाराष्ट्र प्रदेश सचिव किशोर बी पावरा, महाराष्ट्र प्रदेश सदस्य नलिनी बागुल, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष गुलाब एस गावित, नंदुरबार जिल्हा सदस्य शरद बी पाडवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष दिनेश जी सोनवणे, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष जितेंद्र जी तडवी, धडगाव तालुका अध्यक्ष कालूसिंग डी वळवी, नंदुरबार तालुका सचिव सतिष पी भुसावरे, पंकज वळवी, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नंदुरबार जिल्हा अध्यक्ष किशोर गवळे, अनिल मालचे, आदी उपस्थित होते व आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत,