पुणे दि ७ (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते छत्रपती शाहू महाराजांच्या काळात असलेल्या सरदार घराण्यांच्या शस्त्रांचे प्रदर्शनीचे उद्घाटन बालगंधर्व कलादालन येथे उद्घाटन, चित्रपटात व सिरीयल मध्ये शिव छ़त्रपतीं ची भूमिका करणारे शंतनु मोघे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेशबापू कोंडे, प्रतिष्ठानचे सदस्य रणजितसिंह गरुड देशमुख, सदस्य अभयराज शिरोळे पाटील आणि कार्यकारी समिती सदस्य अक्षय उंदरे , तळोदा येथील जाहगीरदार अमरजीतराजे बारगळ,डाॅ प्रतिकसिह राणा व सह्याद्री प्रतिष्ठाण चे प्रमुख श्रमीक गडमुंजे वगैरे 40, सरदार घराण्याचे प्रतिनिधी धार चे उदयराजे पवार ,सरसेनापती दाभाडे चे वंशज सत्यशिलराजे सरकार वगैरे उपस्थित होतेउपस्थित होते.
प्रदशनी शुक्रवारपासून (ता. ७) ते मंगळवारपर्यंत (ता. ११) बालगंधर्व कलादालन येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील.सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित या प्रदर्शनात ४० हून अधिक सरदार घराण्यांची शस्त्रे पाहायला मिळतील. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनाचा जास्तीत लाभनागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पुण्यात ही खान्देशचा इतिहास गाजत आहे.