नंदुरबार दि ५ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाचा इयत्ता बारावी चां निकाल बोर्डाने ऑनलाईन रित्या घोषित केला. त्यात गजमल तुळशीराम पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील 12 वी चा निकाल त्यात तिन्ही शाखांचा एकत्रित निकाल 94.91% लागला असून. तडवी इरम मनोज 85.33% प्राप्त करून महाविद्यालयात तिन्ही शाखांमधून व वाणिज्य शाखेत प्रथम येण्याचा मान पटकाविला.
त्यात वाणिज्य शाखेचा एकूण निकाल 94.74% लागला असून प्रथम क्रमांक तडवी इरम मनोज हीने 85.33% प्राप्त केले. द्वितीय क्रमांक गायकवाड मयुरी मोतीलाल हिने 82.00% प्राप्त केले तर तृतीय क्रमांक विरवाणी यशिका हरिष हिने 81.50% प्राप्त केले.
विज्ञान शाखेचा एकूण निकाल 99.43%लागला असून प्रथम क्रमांक मित्तल दशरथ राठोड ह्याने 84.50% प्राप्त केले व प्रथम क्रमांक प्राप्त केले द्वितीय क्रमांक अग्रवाल योगिनी अतुल हिने 83.00% प्राप्त केले तर तृतीय क्रमांक जैन सयामी संजयकुमार हिने 82.33% प्राप्त केले.
कला शाखेचा एकूण निकाल 86.41%लागला असून असून प्रथम क्रमांक सौदनकर पायल छोटू हिने 73.33% प्राप्त केले. द्वितीय क्रमांक पाडवी प्राची विलास हिने 71.83% प्राप्त केले तर तृतीय क्रमांक शिरसाठ जागृती देवानंद हिने 70.33% प्राप्त केले.
सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे न.ता.वि. समितीचे चेअरमन मा. आमदार भैय्यासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी, संस्थेचे व्हा. चेअरमन मा. मनोजजी रघुवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य कबचौ उमवी जळगाव डॉ.महेंद्रजी रघुवंशी , संस्थेचे समन्वयक.डॉ. एम. एस. रघुवंशी सरउपप्राचार्य प्रा.एस. यू. पाटील, डॉ. एस.पी.पाटील , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.टी. जी. पाटील यांनी अभिनंदन केले व भावी उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सदर विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.