Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अंमली पदार्थ जप्त

नंदुरबार दि १९(प्रतिनिधी) बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगणाऱ्यावर विसरवाडी पोलीसांची कारवाई..एकुण 19 लाख 98 हजार 875 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत..!

दिनांक १७ रोजी विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील गंगापुर गावाचे शिवारात सर्वोत्तम महालक्ष्मी हॉटेलच्या पटांगणात ट्रॉला क्रमांक जी जे २७ टी डी ३५८६ हिचेवर चालक याने त्याचे ताब्यातील ट्रॉलाचे मागील बाजुस बेकायदेशीररित्या मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या अफूचे फुलांची बोंडयाची पिशव्या स्वतःचे आर्थिक फायदयासाठी विक्री करण्याचे उद्देशाने ठेवलेल्या आहेत, अशी गोपनीय माहिती मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व पथक अशांनी मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे विसरवाडी हद्दीतील गंगापुर गावाचे शिवारात सर्वोत्तम महालक्ष्मी हॉटेलचे पटांगण परिसरात जाऊन शोध घेतला असता तेथे एक अशोक लेलैंड कंपनीचा ट्रॉला क्रं. जी जे २७ टी डी ३५८६ हा मिळुन आला. सदर वाहनावरील चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव रुपचंद केसाराम, वय ३६ वर्षे, रा. नाथानियों का वास, ता.जि.बाडमेर, राजस्थान असे सांगितले. त्यास ट्रॉलाचे मागील बाजूस काय आहे बाबत विचारता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यामुळे त्यावर संशय अधिक बळावल्याने त्याचे वाहनाची तपासणी करता त्यामध्ये ताडपत्रीचे आत ४ प्लॅस्टीकच्या पिशव्या आढळुन आल्या. सदर पिशव्या उघडुन पाहता त्यामध्ये अफुच्या फुलांचे बोंडाचे चुरा (अंमली पदार्थ) पथकास मिळुन आल्याने सदर आरोपीस लागलीच पोलीस पथकाने ताब्यात घेतले.
    सदर ट्रॉलातुन एकुण ९९ किलो ७७५ ग्रॅम वजनाचा अफुच्या फुलांचे बोंडाचे चुरा उर्ग वास असलेला अंमली पदार्थ व वाहन असा एकुण 19,98,875/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याअन्वये ट्रॉला चालक आरोपी नामे रुपचंद केसाराम, वय 36 वर्षे, रा.नाथानियो का वास, ता.जि.बाडमेर, राजस्थान याचेविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं.- 151/2025 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 चे कलम 8 (क), 18(क), 22(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोउपनि किरण पाटील, विसरवाडी पो. ठाणे हे करीत आहेत.
      सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उप विभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग  संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोउनि  किरण पाटील, पोना/अनिल राठोड, पोकों, निखील ठाकरे, लिनेश पाडवी, रामचंद्र ठाकरे, दिनेश पावरा अशांनी केली आहे.