Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिक्षकांना राष्ट्रीयस्तरावर प्रशिक्षणासाठी सुवर्ण संधी सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र,सी.सी.आर.टी.नवी दिल्ली

शिक्षकांना राष्ट्रीयस्तरावर प्रशिक्षणासाठी सुवर्ण संधी
     सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र,सी.सी.आर.टी. (CCRT- Center For Cultural Resources & Training) नवी दिल्ली यांच्या मार्फत जून २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष (Offline) प्रशिक्षणांचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षकांनी आपली नोंदणी खालील लिंकवर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी करू शकतात. https://forms.gle/EFFyac5zrx4bnCDPA नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने प्राधान्य मिळेल, अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात येईल. सदरील नोंदणी करण्याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांना अवगत करण्यात येत आहे. तसेच उपरोक्त लिंकचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करण्यात यावा. असे आवाहन डॉ.राजेंद्र महाजन, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांनी केले आहे.