सी.सी.आर.टी. (CCRT- Center For Cultural Resources & Training) नवी दिल्ली संस्थेच्या वतीने दरवर्षी वय वर्षे १० ते १४ या वयोगटातील विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील संगीत, नृत्य, नाटक,चित्रकला, शिल्पकला, हस्तव्यवसाय, सृजनशील लेखन, साहित्य-कला इ. कलांमधील पुढील प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिल्या जातात. सन २०२५-२६ मध्ये विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर शिष्यवृत्ती योजनेची माहिती दि. २५ मे २०२५ रोजी वृत्तपत्रांमध्ये सीसीआरटी, नवी दिल्ली संस्थेतर्फे देण्यात आलेली आहे. सोबत जोडलेल्या सीसीआरटी, नवी दिल्ली संस्थेकडील पत्रासोबत शिष्यवृत्ती योजनेची पूर्ण माहिती व शिष्यवृत्ती साठीचा अर्ज जोडलेला आहे. किंवा www.ccrtindia.gov.in ह्या वेबसाईटवरून अर्ज डाउनलोड सुद्धा करता येतील. हे अर्ज पूर्ण भरून फोटो व आवश्यक कागदपत्रांसह (Hard Copy) सीसीआरटी, नवी दिल्ली संस्थेस दि. ३० जून २०२५ पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रे न जोडलेले अर्ज किंवा अंतिम तारखेनंतर पोहोचणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तरी आपल्या नंदुरबार जिह्यातील सर्व शाळांपर्यंत सदर शिष्यवृत्ती योजनेची पूर्ण माहिती पोहोचवावी जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. असे आवाहन डॉ.राजेंद्र महाजन, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,(डायट) नंदुरबार यांनी केले आहे.
१० ते १४ या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार
June 10, 2025
१० ते १४ या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार